Arrested Sakal
अहिल्यानगर

श्रीगोंद्यात नऊ लाखांची गांजाची झाडे जप्त; दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

श्रीगोंदे (अहमदनगर) : शहराजवळील जगतापवस्ती व दत्तवाडी शिवारात बाळू हरी जगताप व अरुण हरी जगताप या दोघा भावांनी शेतातील लिंबोणीच्या बागेत केलेली गांजाची शेती पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने उद्‍ध्वस्त केली. यावेळी ८९ किलो वजनाची व आठ लाख ९५ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली.

याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार जगताप बंधूंनी त्यांच्या शेतातील लिंबोणीच्या बागेत गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या शेताची पाहणी केली असता, लहान-मोठी १९ गांजाची झाडे आढळून आली. त्यांचे वजन ८९ किलो ५०० ग्रॅम भरले. त्याची किंमत आठ लाख ५५ हजार रुपये आहे.

आरोपींनी निंबोणीच्या बागेतील मोकळ्या जागेत कोणाच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी गांजाची झाडे लावली होती. श्रीगोंदे पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल दादा टाके यांच्या फिर्यादीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT