In the captivity of Nagar Corona ... six more new patients added 
अहिल्यानगर

नगर कोरोनाच्या कैदेत...आणखी सहा नव्या रुग्णांची भर 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना बाधितांच्या संख्येत काही दिवसांपासून खंड पडत नसल्याने नगर कोरोनाच्या कैदेत सापडले आहे. दिवसेंदिवस प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे. शहरासह जिल्ह्यातील आकडा वाढत असल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली. आज आणखी सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात संगमनेर तीन, पारनेर दोन, नगर शहरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा संख्या 282 वर पोचली आहे. आज आणखी चार जणांनी कोरोनावर मात मिळवल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 237 झाली. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाईकवाडपुरा (संगमनेर शहर) या हॉटस्पॉट क्षेत्रात आज 59 वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 45 वर्षीय पुरुषाला आजाराची लक्षणे जाणवल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले असता, कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय भाळवणी (पारनेर) येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला. या मुली यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहे. मूळचा झारखंड येथील असलेला सारसनगर (नगर शहर) येथे राहणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तिलाही कोरोनाची बाधा झाली. कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून तो आला होता. 

आणखी चार जणांना डिस्चार्ज 
 अहमदनगर जिल्ह्यातील चार रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. त्यात संगमनेर दोन, नगर शहरातील सारसनगर, बोल्हेगाव येथील एकाचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना निरोप दिला. त्यांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 237 झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT