nagar aacident 
अहिल्यानगर

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

सकाळन्यूजनेटवर्क

अहमदनगरः अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ (ता. नेवासा) कार आणि खासगी आराम बसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (सोमवार) पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील सर्व मृत जालना जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. 

अधिक माहिती अशी की, स्वीफ्ट कार (एमएच 21 बीएफ 7178) औरंगाबादहून नगरकडे येत होती. देवगड फाट्याजवळ नगरकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच 19 वाय 7123) तिची धडक झाली. यात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT