Case filed against MLA Sangram Jagtap 
अहिल्यानगर

आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा, हैप्पीवाला बर्थ डे नडला 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. एकत्र जमल्यानंतर प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे. परंतु आमदार संग्राम जगताप यांचा काल वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यक्रमात नियमांचे पालन केले नाही.

विनामास्क एकत्र येऊन, कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध आज कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

कोतवाली पोलिस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील कर्मचारी सचिन गोरे यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की 12 जून 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आमदार जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अभिजित खोसे, बाबा गाडळकर, संतोष ढाकणे, माऊली जाधव यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्ते आयुर्वेद कॉलेज परिसरातील आमदार जगताप यांच्या कार्यालयासमोर जमले होते.

जगताप यांच्यासह या कार्यकर्त्यांनी मास्क घातलेले नव्हते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. गोरे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 188 व 269 अन्वये जगताप यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT