case filed but no withdrawal MP Sadashiv Lokhande water crisis farmers of Nilwande Sakal
अहिल्यानगर

Shirdi News : गुन्हा दाखल झाला, तरी माघार नाही; खासदार सदाशिव लोखंड, निळवंडेच्या पाणीप्रश्नी शेतकऱ्यांना पाठिंबा

समन्यायी कायद्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : इंग्रजांनी धरणे बांधली आणि दुष्काळी भागाला पाणी दिले. नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्याला पाठिंबा देऊन हे पाणी जायकवाडी धरणासाठी दिले. आता निळवंडेच्या पाण्यासह या प्रश्नी होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी होऊ. पहिला गुन्हा माझ्यावर दाखल झाला, तरी मागे हटणार नाही, असा इशारा खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला.

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी पुढाकार घेऊन येथील विश्रामगृहावर निळवंडे व गोदावरीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. समन्यायी कायद्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

बैठकीस शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, निळवंडे पाटपाणी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, नितीन कापसे, गंगाधर चौधरी, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, सुखलाल गांगवे, राजेंद्र सोनवणे, सुरेश तरके, संपतराव चौधरी, संजय सदाफळ, रावसाहेब थोरात, महेश देशमुख, राजेंद्र रोहम, राजेंद्र कार्ले, विजय काळे आदी उपस्थित होते.

लोखंडे म्हणाले की, जायकवाडीत पाणीसाठा असताना मुळा, निळवंडे, भंडारदरा व गोदावरी कालव्यांवर अन्याय का केला जात आहे. जायकवाडीला पाणी सोडले जाणार असल्याने निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातील शेतकऱ्यांचे बंधारे व तलाव प्रशासकीय अधिकारी भरू देत नाहीत.

या प्रश्नी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालू. निळवंडे डाव्या कालव्यातील कोपरगाव शाखा, तळेगाव शाखा या भागातील गावांना निळवंडेचे पाणी फक्त गावात आले आणि लगेच बंद झाले. या प्रश्नी आपण अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेऊ.

गुजरात पॅटर्नच्या धर्तीवर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणाचे काम लवकर सुरू होणार आहे. निळवंडेच्या वितरिका तयार करण्यासाठी आणखी दोन हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. गोदावरी, निळवंडे, भंडारदरा व मुळा कालव्यांच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत.

- सदाशिव लोखंडे, खासदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT