Casteism in Ahmednagar Shiv Sena 
अहिल्यानगर

नगर शिवसेनेत उफाळला "जाती"वाद, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिले पत्र

अमित आवारी

नगर ः नगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी (ता. 1 ऑक्‍टोबर) महासभा बोलावण्यात आली आहे. या पदासाठी शिवसेनेकडून दोन नावे निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या सावेडी विभाग प्रमुखाने नाराजी व्यक्‍त केली आहे. या गटातील चंद्रकांत शेळके यांनी ही नाराजी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कळविली आहे. 

शेळके यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगरमध्ये गुरुवारी (ता. 1) स्वीकृत नगरसेवक भरणार आहे तरी 
आजपर्यंत स्वर्गीय अनिल राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण शिवसेनेत केले नाही म्हणून नगरमध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसापासून जातीचे राजकारण करून स्वर्गीय अनिल राठोड यांना पराभूत केले होते.

आजही स्वीकृत नगरसेवक निवडताना जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. आपण यात लक्ष घालावे नाही तरी नगरची शिवसेना एकतर भाऊ कोरेगावकर यांनी व काही जातीवादी फुटीर शिवसैनिकांनी आपल्या पक्षाला गळती लावायचे काम करून राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ देत आहेत. आपणास विनंती आहे की, आपण यात तातडीने लक्ष घालावे व नगर शिवसेनेमध्ये चाललेली धुसफूस थांबवावी अन्यथा या पुढील काळात शिवसेनेला याची मोठी किंमत मोजवी लागणार आहे, असे पत्राद्वारे कळविले आहे. 

या पत्रामुळे शिवसेनेतील दोन्ही गटांतील वाद समोर आला आहे. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. एका गटात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे, बाळासाहेब बोराटे, चंद्रकांत शेळके आदी आहेत तर दुसऱ्या गटात शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे आदी आहेत.

दोन्ही गटांकडून मदन आढाव यांचे नाव निश्‍चित आहे. मात्र उर्वरित एका जागेसाठी दिलीप सातपुतेच्या गटाकडून विक्रम राठोड यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, अशा वेळी दुसऱ्या गटाने शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांच्याकडून संग्राम शेळके यांचे नाव स्वीकृत नगरसेवकासाठी पुढे केले असल्याचे समजते. त्यामुळे सध्या शिवसेनेत चांगलीच धुमश्‍चक्री सुरू आहे. मागील वेळीही हीच दोन नावे सादर करण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोणीही आवाज उठविला नव्हता. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माजी नगरसेवक विपूल शेटिया यांचे नाव निश्‍चित समजले जाते. उर्वरित एक जागा आमदार संग्राम जगताप निश्‍चित करणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थायी समिती सभापती निवडी प्रमाणेच आणखी एखाद्या पक्षातील कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक करून पुढील गणिते बळकट करण्याचीही शक्‍यता आहे. त्यामुळे इतर पक्ष कार्यकर्त्यांत चर्चा रंगली होती. भाजपकडून अजूनही नाव निश्‍चित झाले नसले तरी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, रामदास आंधळे आदींची नावे चर्चेत आहेत. 

आमदार अनिलभैयांनीही संपर्कप्रमुख बदलण्याची मागणी विधानसभा निवडणुकीनंतर केली होती. ते कोणालाच विचारात घेत नाहीत. त्यामुळे पक्षाचे वाटोळे होत आहे. ते रोखण्यासाठीच मी पत्रप्रपंच केला.

- चंद्रकांत उर्फ काका शेळके, शिवसेना, सावेडी विभागप्रमुख, नगर.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT