Cattle, damage to agriculture in Pathardi due to deer 
अहिल्यानगर

रानडुकरे, हरणांनी पाथर्डीतील शेती घातली घशात

राजेंद्र सावंत

पाथर्डी : रानडुकर व हरणांनी पिकांची नासाडी केल्याने, बळीराजा संकटात सापडला आहे. ऊस, तूर, मूग या पिकांना हरण व रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वेळेत झालेल्या पावसामुळे पिके तरारून आली. मात्र, "दैव देते आणि कर्म नेते..' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागाकडून मिळणारी तोकडी मदतही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मिळत नाही. 

तालुक्‍यात जूनपासूनच चांगला पाऊस झाला. कपाशी, ऊस, मूग, तरू, बाजरीची पिके जोमात आली. मात्र, शेताला कुंपन नसणाऱ्या शेतकऱ्यांची पिके हरणांनी खाऊन टाकली. उसाचे रानडुकरांनी नासाडी केली. मोहोज देवढे, येळी, अकोले, माणिकदौंडी, बोरसेवाडी, रांजणी, शिरसाटवाडी, केळवंडी विशेषत: डोंगराळ भाग असलेल्या अनेक गावांतील पिकांची वन्यप्राण्यांकडून नासाडी सुरू आहे.

मोहोज देवढे येथील दिलीप देवढे, इंदूबाई सावंत, संदीप देवढे, येळी येथील अण्णा ढोले, रामनाथ बडे, माणिक दौंडी येथील अलीम पटेल, बोरसेवाडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी केली आहे. 

मोहोज देवढे परिसरातील पिकांची रानडुकरे व हरणांनी नासाडी केली. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची विनंती वन अधिकाऱ्यांना केली, तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. तुम्हीच फोटो काढुन आणून देण्यास सांगतात. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी एकनाथ वनाकचौरे यांनी केली आहे. 

वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवने म्हणाले, की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल, त्यांनी वन विभागाकडे अर्ज करावेत. पंचनामे करुन भरपाईसाठी नगरला प्रस्ताव पाठविले जातील. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT