तिसरा डोळा 
अहिल्यानगर

आता कर्जत-जामखेडवर "तिसऱ्या"चाच डोळा

नीलेश दिवटे

कर्जत ः कर्जत-जामखेड शहरावर आता तिसऱ्याचा डोळा राहणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प राबविण्यासाठी सहा कोटी ३७ लाखांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शहरांच्या ४९ स्थळांवर सुमारे १२० सीसीटीव्ही कॅमेरे व १३ पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे.

हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टीम, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम आदींचा सामावेश असणार आहे. त्यामुळे शहरांची कायदा- सुव्यवस्था सुरळीत राखण्याबरोबरच वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. (CCTV cameras will be installed in Karjat-Jamkhed city)

सार्वजनिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवर नियंत्रण, वाहतूक नियंत्रण, तसेच शहरातील संवेदनशील भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही यंत्रणा फारच प्रभावी काम करणार आहे.

गुन्हा घडू नये, महिलांवर अत्याचार होऊ नयेत, या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आमदार रोहित पवारांची ही संकल्पना कर्जत व जामखेडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला दुवाच ठरणार आहे.

सध्या कर्जत व जामखेडची पोलिस यंत्रणा कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगले काम करीत आहे. गुन्ह्यांचा तपासही योग्यरीत्या लावत आहेत. असे असताना कमी मनुष्यबळाचा मोठा ताण त्यांना सहन करावा लागतो. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पामुळे त्यांच्या तपासकामात नक्कीच मदत होणार आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास वेगाने लावण्यात त्यांना यश मिळणार आहे. आमदार पवार यांच्या पुढाकारातून व पोलिस अधिकाऱ्यांच्या नियोजनातून ग्रामसुरक्षा यंत्रणेसारखे प्रभावी उपक्रम अनेक गावांच्या सुरक्षेसाठी ढाल बनून काम करीत आहेत. आता कर्जत व जामखेड शहरांच्या सुरक्षिततेला सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पामुळे अधिक बळकटी मिळणार आहे.

कर्जत व जामखेड शहरांत वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची कायमच गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होतो. मात्र, गुन्हेगारी स्वरूपाच्या अनेक घटनांवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत व जामखेडची पोलिस यंत्रणा उत्कृष्ट काम करीत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प पोलिसांच्या मदतीसाठी महत्त्वाची भूमिका निभावेल.

- रोहित पवार, आमदार, कर्जत- जामखेड

(CCTV cameras will be installed in Karjat-Jamkhed city)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT