Central govt should allow export of sugar Ajit Pawar Farmers should focus on agriculture rather politics Sakal
अहिल्यानगर

Ajit Pawar : साखरेच्या निर्यातीस केंद्राने मुभा द्यावी; अजित पवार

अजित पवार ः शेतकऱ्यांनी राजकारणापेक्षा शेतीकडे लक्ष द्यावे

सकाळ वृत्तसेवा

राशीन (जि.नगर) : ‘केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही साखरेच्या निर्यातीस मुभा द्यावी, म्हणजे उसाला चांगला दर देता येईल,’ असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. अंबालिका साखर कारखान्याने कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अभय जैन, पुणे येथील व्ही. एस. आय.चे कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख पी. पी. शिंदे. व्ही. एस. आय.चे शास्त्रज्ञ एस. एस. कटके आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राजकारणात बारीक लक्ष देण्यापेक्षा शेती आणि उत्पन्नाकडे अधिक लक्ष द्यावे. शेतीबाबत ज्यांचा अनुभव दांडगा असेल त्यांचे अनुभव ऐकावेत. कमीत कमी पाण्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

रामदेवबाबा लक्ष्य

मेळाव्याला उपस्थित एक शेतकरी हातांची नखे एकमेकांवर घासत असल्याचे पाहून अजित पवार त्याला म्हणाले, की हे तुम्ही रामदेवबाबांचे पाहून करताय ना? हे काही खरे नाही. माझे होते ते डोक्यावरचे केस कमी झाले. काही ऐकायचे असेल तर महापुरुषांचे आणि साधुसंतांचे ऐका... बुवा-बाबांच्या नादी लागू नका.

अजित पवार यांच्या सूचना

  • योग्य वजन दाखविण्याची स्पर्धा साखर कारखान्यांनी करावी

  • ऊसशेतीसोबतच ज्या पिकातून शेतकऱ्यांना पैसे मिळतील ते पीक घ्या

  • जिथे फायदा होईल तिथे ऊस द्या

  • ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांना आता कोणाच्या मागे लागावे लागणार नाही. काही वर्षांतच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उसासाठी शेतकऱ्यांच्या दारात येतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT