chief accountant of ahmednagar municipal corporation arrested for soliciting bribe Google
अहिल्यानगर

अहमदनगर महापालिकेतील मुख्य लेखाधिकारी लाचेच्या सापळ्यात

गोरक्षनाथ बांदल


अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर यांना ठेकेदाराच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी २० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने आज अटक केली.

एका ठेकेदाराला महापालिकेत केलेल्या कामाची बिले मंजूर करून धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय ५२, रा. दिल्ली गेट, मानकर गल्ली, नगर. हल्ली रा. उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, पुणे) यांनी संबंधित ठेकेदाराकडे २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार ठेकेदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ता. ७ ऑक्‍टोबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी केलेल्या लाच मागणी पडताळणामध्ये करण्यात आली. प्रवीण मानकर यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. त्याच दिवशी १५ हजार रुपये स्वीकारण्याची संमती दर्शवली. पंचासमक्ष हे बोलणे झाले होते. त्यामुळे आज (बुधवारी) त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुष्पा निमसे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT