Circulation escaped from the left canal of Mula Dam 
अहिल्यानगर

मुळा धरणातून आवर्तन सुटले बरं का

विलास कुलकर्णी

राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आज सकाळी 11 वाजता शंभर क्‍यूसेकने रब्बीतील सिंचनासाठी आवर्तन सोडले. उजव्या कालव्यातून उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता आवर्तन सोडणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली. 

मुळा धरणात आज सकाळी सहा वाजता 21 हजार 179 दशलक्ष घनफूट (81.44 टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. सिंचनासाठी 15 जानेवारीपासून रब्बीतील पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला होता.

त्यानुसार डाव्या कालव्यातून आवर्तन सुरू झाले. मात्र, उजव्या कालव्यावरील शाखाधिकारी, कालवा निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत निवडणूक कामासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे उजव्या कालव्याचे आवर्तन नियोजनाच्या एक दिवस उशिरा, उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता सुरू केले जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

डाव्या कालव्याचे आवर्तन 30 दिवस, उजव्या कालव्याचे आवर्तन 40 दिवस चालेल, असेही पाटील म्हणाल्या. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT