

Gyanesh Kumar Padma Bhushan
esakal
Chief Election Commissioner Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी त्यांच्या समर्थनार्थ वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वतंत्र व शांततापूर्ण निवडणुका घेण्यासह मतदार यादी दुरुस्त करण्याच्या कामात ज्ञानेश कुमार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा त्यांनी केला. त्यासाठी ज्ञानेश कुमार यांना किमान पद्मभूषण, तर काही वेळा पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा, असे भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.