The accused in the murder case was found three years later 
अहिल्यानगर

नगर जिल्हा प्रशासनाचा मोर्चा हॉटेल्सवाल्यांकडे

सकाळ वृत्तसेवा

नगर ःकोरोनाचा उद्रेक झाला असून, त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांवर मात्र काही जणांकडून पाणी फेरण्याचे काम केले जात आहे.

हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवणाऱ्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली. यामध्ये शहरातील चार हॉटेलांचा समावेश असून, जेवणावळी करणाऱ्यांनाही दंडाचा झटका देण्यात आला आहे. 

शहरासह जिल्ह्यात रात्री आठनंतर संचारबंदी लागू केलेली आहे. तसा अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. असे असतानाही शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हॉटेल्स व उपाहारगृहे सुरूच राहत आहेत. त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी रात्री शहरातील स्थितीचा आढावा घेतला. या वेळी शहरात हॉटेल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी अशा हॉटेलांवर दंडात्मक कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत जेवणाऱ्यांवरही पोलिस प्रशासनाने कारवाई केली. 

शहरातील हॉटेल हिरा पॅलेसवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वेळी जेवण करीत असलेल्या एकूण 26 जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 25 हजाराचा दंड हिरा पॅलेसच्या कारवाईत वसूल करण्यात आला. 
शहरातीलच थापर हॉटेलवरही कारवाई करण्यात आली असून, हॉटेल व्यवस्थापनाला दहा हजारांचा, तर उपस्थित सात ग्राहकांना सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

सुवर्णम प्राइड हॉटेलवरही कारवाई करण्यात आली असून व्यवस्थापनाला दहा हजार रुपये दंड करण्यात आला. हॉटेल परिचय येथेही कारवाई करण्यात येऊन एका जणाकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्यातून देण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT