city wide gas pipeline did not end series of accident ahmednagar  sakal
अहिल्यानगर

नगर-दौंड गॅस पाइपलाइनमुळे अपघातांची मालिका संपेना

नगर-दौंड रस्त्याची स्थिती; हिवरे झरे येथे तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : नगर-दौंड रस्त्यालगत गॅस पाइपलाइनसाठी खोदाई सुरू असल्याने, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. येथील अपघातांची मालिका संपता संपेना, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला काम करू न देण्याचा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

नगर-दौंड रस्त्यालगत गॅसच्या पाइपलाइनसाठी खोदाईचे काम सुरू आहे. काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून याबाबत कुठलेच नियोजन नाही. रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने, तसेच मुरूम- माती पडल्याने येथे वारंवार अपघात होत आहेत. या कामामुळे खंडाळा व हिवरे झरे परिसरातील गावांमध्ये तर रोजच अपघात होत आहेत. गेल्या आठ दिवसांत या परिसरात अपघातांची मालिका सुरू असून, नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यापुढे गॅसच्या पाइपलाइनचे काम करू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात अपघातामध्ये किरण टेकाडे हा तरुण गंभीर जखमी झाला. पेट्रोल पंपासमोर एका वृद्धास वाहनाने उडविले. मंगळवारि (ता. ८) खंडाळा शिवारात सायंकाळच्या सुमारास एक मुलगा कारलाला धडकला व गंभीर जखमी झाला. त्यानंतर लगेचच हिवरे झरे येथे गॅस पाइपलाइनच्या बंद कामामुळे झालेल्या अपघातात सागर मोहारे (वय २७) हा तरुण मृत्युमुखी पडला.

वाढता वेग, बेशिस्त चालक, रस्त्याचे सुरू असलेले काम, त्यातच पाइपलाइनच्या कामामुळे रस्त्यावर पडलेली माती, मुरूम यामुळे नगर-दौंड रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावर काम सुरू असलेल्या ठिकाणी फलक, रिफ्लेक्टर अशा उपाययोजना राबवीत संबंधित ठेकेदाराकडून काळजी घेणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी परिसरातील संतप्त ग्रामस्थांसह, यापुढे काम होऊ न देण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT