Civil Hospital vandalized by patient's relatives esakal
अहिल्यानगर

संयम सुटला : सिव्हिल हॉस्पिटलची नातेवाईकांकडून तोडफोड

पेशंट दगावल्याने संताप अनावर

अशोक निंबाळकर

नगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव वाढल्याने मृत्यूचा आकडाही वाढू लागलेला आहे. अश्रूंचे बांध अनावर होत आहे. अश्रूंचा बांध फुटल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांचा तोल ढासळत आहे. परिणामी रुग्णालयांमध्ये तोडफोडीच्या घटना घडत आहेत. जिल्हा रुग्णालयात आज (रविवारी) अशीच एक घटना घडलेली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णांचा रविवारी (ता.18) सकाळी मृत्यू झाला. मयत रुग्णाचे नातेवाईक महिलाही कोरोना बाधित असल्याने त्यांच्यावरही रुग्णालयातच उपचार सुरु होते. या घटनेची माहिती त्यांना समजल्यानंतर त्यांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात एक काच फुटली आहे. या घटनेची तातडीने माहिती तोफखाना पोलिस ठाण्याला देण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक एस. बी. सुरसे हे फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. पोलिस रुग्णालयात येताच गोंधळ कमी झाला. या वेळी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. परंतु गोंधळ घालणाऱ्या महिला असून त्यांनाही कोरोनाची बाधा झालेली असल्याची बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितली. त्यामुळे पोलिसही हतबल झाले. विशेष म्हणजे या फौजफाट्यात महिला कर्मचाऱ्याचा समावेश नव्हता.

एखाद्या गुन्ह्यात कोणाला अटक केली तर त्याची वैद्यकीय तपासणी करूनच त्याला अटक केली जाते. मात्र येथे समोरच कोरोनाबाधीत असल्याचे पोलिसांपुढे मोठा पेच उभा राहिला होता. त्या महिलांना शांत करत पोलिसांनी घटनास्थळावरून जाणेच पसंत केले. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात कुठलीच तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनाही कार्यवाही करता आली नाही.

आरोग्याला माणुसकीचा पाझर...

शासकीय कार्यालयातील वस्तूंची मोडतोड झाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल केला जातो. घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने त्यात रुग्णालयातील काच फुटली. परंतु संबंधित बाधित असल्याने गुन्ह्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. हे गृहीत धरून जिल्हा रुग्णालयाने माणुसकीच्या नात्यातून गुन्हा दाखल केला नाही.

जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर आम्ही विशेष लक्ष देऊन उपचार करीत असतो. त्यात एखाद्याचा मृत्यू झाला की नातेवाईकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागते. नातेवाईकांनी आरोग्य विभागाची परिस्थिती व सध्याची स्थिती लक्षात घेऊन सहकार्य करावे. -डॉ. सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT