Cloudy weather and unseasonal rains in Nevasa are causing diseases on crops
Cloudy weather and unseasonal rains in Nevasa are causing diseases on crops 
अहमदनगर

ज्वारीवर लष्करी अळीचा 'अटॅक' ; नेवासे तालुक्‍यात दोन हजार हेक्‍टर पिकाचे क्षेत्र, शेतकऱ्यांची वाढली चिंता

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या वातावरणामुळे ज्वारीवर काही प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीने 'अटॅक' केला आहे. तसेच ढगाळ हवामान आणखी काही दिवस राहिल्यास गहू, हरभरा पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील पिके वाया गेली. शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या नजरा रब्बीकडे लागल्या होत्या. दमदार पावसामुळे तालुक्‍यात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी रब्बीत गहू, हरभरा, ज्वारी पिकांवर भर दिला. तालुक्‍यात ज्वारीचे 2 हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. सुरवातीला पेरणी उरकलेल्या ज्वारीची वाढ चांगली झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच, काही दिवसांपासून पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर औषधफवारणी करण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा मार्ग नाही. परंतु, औषधांच्या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेर आहेत. एकरी दीड हजारांचा खर्च येत असल्याने, उत्पादन हाती येण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. 

रोगाला असे करा नियंत्रित 

कृषी सहायकांच्या मदतीने तातडीने उपाययोजना सुचविल्या जात आहेत. कामगंध सापळ्यासह एकात्मिक कीड व्यवस्थापनसह क्‍लोरो अंट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी.अथवा नोमुरिया रिलेयी 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून मिसळून फवारणी केल्यास, या किडीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. या अळीचा प्रसार रोखण्यासाठी नर पतंग पकडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी फेरोमोन सापळे शेतात लावण्याचे आवाहन केले आहे. 

अळीच्या डोक्‍यावर उलटा 'वाय' आकारातील चिन्ह दिसते. शेवटच्या भागावर काळे चार ठिपके असतात. त्यावरून ही अळी ओळखता येते. अळीची वाढ पूर्ण होण्यासाठी 15-16 दिवस लागतात. पूर्ण वाढलेली अळी कोषावस्थेत जमिनीत जाते. सात-आठ दिवसांतून त्यातून पतंग बाहेर पडतो. किडीचा जीवनक्रम 25-30 दिवसांत पूर्ण होतो. नर पतंग व मादीच्या मिलनातून पुन्हा अंडीपुंज तयार होऊन एका पुंजातून 7-8 अळी तयार होतात. 
- दत्तात्रेय डमाळे, तालुका कृषी अधिकारी, नेवासे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', थालावर भडकला चेन्नईचा माजी स्टार खेळाडू

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT