Commencement of corona vaccination in Parner 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये कोरोना लसीकरणास प्रारंभ

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर : कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील मातोश्री रुग्णालयात कोरोना लसीकरणास आज (ता. पाच) सुरवात झाल्याची माहिती डॉ. दीपक आहेर व सचिव किरण आहेर यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय व राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे याच रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध केल्याचे डॉ. श्‍वेतांबरी आहेर यांनी सांगितले. 

पारनेर तालुक्‍यातील हे पहिलेच खासगी रुग्णालय आहे, की जेथे लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या रुग्णालयात साठ वर्षांपुढील सर्व ज्येष्ठ नागरिक, तसेच 45 वर्षांपुढील अन्य व्याधिग्रस्तांना (मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार) या लसीचा लाभ घेता येणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

या अभियानाचा तालुक्‍यातील सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा व कोरोना साथीच्या निर्मूलनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दीपक आहेर यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT