green filed 
अहिल्यानगर

सुरत-हैदराबाद महामार्गाचे काम सुरू, कोणाच्या जमिनी जाणार

विलास कुलकर्णी

राहुरी : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरत-हैदराबाद सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचा (ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे) पहिला टप्पा सुरू झाला आहे. महामार्गाचे रेखांकन (मार्ग निश्चिती) झाले आहे. येत्या तीन महिन्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. तसा दुजोरा राष्ट्रीय महामार्ग नगर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल दिवाण यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिला.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाची घोषणा केली. सन २०१८ मध्ये सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (ग्रीनफील्ड हायवे) प्रस्तावित करण्यात आला. २०१७-१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील पांगरी ते नगरजवळील वाळकीपर्यंत केंद्रीय सर्वेक्षण पथकाने उपग्रहाद्वारे आत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केले.(Commencement of Surat-Hyderabad Greenfield Expressway)

२०१९मध्ये भूसंपादनाची अधिसूचना जाहीर करून नगर जिल्ह्यात चार सक्षम अधिकारी म्हणून राहुरी, नगर, राहाता, संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना अधिकार दिले. मात्र त्यानंतर त्याची फक्त चर्चा होत राहिली.

नगर जिल्ह्यातून संगमनेर (१८), राहाता (५), राहुरी (२४), नगर (९) अशा चार तालुक्यातील ५६ गावांमधून शंभर किलोमीटर महामार्गाचे काम होणार आहे. राहुरी तालुक्यातील धानोरे-सोनगाव ते राहुरी (मुळानदी) २२ किलोमीटर, राहुरी खुर्द ते डोंगरगण १८ किलोमीटर असा तब्बल ४० किलोमीटर अंतरावरील भूसंपादन होणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची राहती घरे, बागायती जमिनी जात आहेत. मुख्य सहापदरी रस्ता, त्याच्या दुतर्फा साईट पट्ट्या, दोन लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. जमिनीवर १५ फुटांवर महामार्ग होणार असल्याचे समजते.

राहुरी तालुक्यात यापूर्वी के. के. रेंज, मुळा धरण, कृषी विद्यापीठ या प्रकल्पांसाठी जमिनी संपादित झाल्या आहेत. पेट्रोलियम कंपनीच्या डिझेल व पेट्रोल वाहिनीसाठी जमिनींचे हस्तांतरण झाले आहे. आता सुरत-हैदराबाद ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमिनी संपादन होणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध आहे. परंतु, यापूर्वी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

नाशिक-नगर आणि सोलापुरातील जमिनी जाणार

सुरत-नाशिक-नगर-सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (ग्रीनफील्ड हायवे) करण्यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी 2018मध्ये सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (ग्रीनफील्ड हायवे) प्रस्तावित करण्यात आला. (Commencement of Surat-Hyderabad Greenfield Expressway)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT