अहिल्यानगर

अमेरिकेतून येऊन मायभूमीत उभारली कंपनी

जागतिकीकरणातून माहिती तंत्रज्ञानाची कवाडे उघडल्याने व्यावसायिक शिक्षणातून जागतीक पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली.

आनंद गायकवाड

जागतिकीकरणातून माहिती तंत्रज्ञानाची कवाडे उघडल्याने व्यावसायिक शिक्षणातून जागतीक पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली.

संगमनेर - माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ग्रामीण भागातील मुलांचा टक्का कमी पडत असल्याचे शल्य कायम होते. स्वतः ग्रामीण भागातील असूनही या क्षेत्रात बऱ्यापैकी जम बसल्यावर, आपल्यासारख्या अनेकांच्या स्वप्नाला मूर्तरुप देण्यासाठी त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून आपली मातृभुमी निवडली. अमेरिकेत आयटी कंपनी चालवणारे रावसाहेब घुगे यांनी अमेरिका सोडून आपल्या मायभूमित पारेगाव खुर्दच्या माळरानावर आयटी कंपनी उभारली आहे.

जागतिकीकरणातून माहिती तंत्रज्ञानाची कवाडे उघडल्याने व्यावसायिक शिक्षणातून जागतीक पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली. महानगरांमध्येही या क्षेत्रातील शिक्षणाचे विविध पर्याय निर्माण झाले, मात्र यात ग्रामीण भाग मागेच राहिला. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्य घडविण्याचे स्वप्नं पाहून शेतकरी, कष्टकरी व सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. मात्र महानगरांच्या तुलनेत शैक्षणिक दर्जा व परदेशी नोकरी करण्यासाठी कुटुबांचा अडथळा, यामुळे अनेकांचा स्वप्नभंग झाला. रावसाहेब घुगे यांनी शिक्षण पूर्ण करुन अमेरिकेतील कंपनीत काही वर्ष काम केले. तेथेच स्वतःची बिझनेस ॲप्लिकेशन ॲण्ड प्लॅटफॉर्म ही कंपनी सुरू करुन अल्पावधीतच चांगला जम बसवला. ही संधी आपल्या भागातील मुलांना उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी वॉशिंग्टनहून थेट पारेगाव खुर्द गाठले.

मित्रांच्या सल्ल्यातून गावाच्या माळरानावर जानेवारीत भुमिपूजन झालेल्या या कंपनीचे भव्य कार्यालय उभे राहिले. जिल्ह्यातील पहिली आयटी कंपनीचा प्रारंभ रविवारी (ता. ३१) रोजी होत आहे.

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असलेल्या अफाट क्षेत्रात शेतकरी व ग्रामीण भागातील मुले मागेच आहेत. पारेगावच्या या कंपनीत केवळ शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देऊन, प्रशिक्षणासह कंपनीत नोकरी देणार आहे.

- रावसाहेब घुगे, संस्थापक, आयटी कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT