Complain of embezzlement in Nagar Urban, letter to police bank 
अहिल्यानगर

नगर अर्बनमधील अपहारप्रकरणी तक्रार करा, पोलिसांचे बँकेला पत्र

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेतील अडीच कोटींच्या अपहारप्रकरणाच्या तक्रारीची तपासणी केली असता, प्रथमदर्शनी हा गुन्ह्याचा प्रकार दिसतो. त्यामुळे याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देऊ शकता, असे पत्र कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी नगर अर्बन बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांना दिले आहे. 

बॅंकेच्या मुख्य शाखेसह अन्य शाखांतील संशयास्पद व्यवहारातून अडीच कोटींचा अपहार झाल्याचे म्हटले जाते. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्यानंतरही बॅंकेकडून कोणी फिर्यादी होत नाही. त्यामुळे हा गुन्हा दाखल होत नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी आता बॅंकेच्या प्रशासकांनाच पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखविल्याने ते प्रतिसाद देतात की नाही, याबाबत कुतूहल व्यक्त होत आहे. 

पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी प्रशासक मिश्रा यांना 10 डिसेंबरला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की 11 सप्टेंबरला बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, मुख्य व्यवस्थापक सतीशकुमार रोकडे, प्रमुख व्यवस्थापक महादेव साळवे व मुख्य शाखाधिकारी मारुती औटी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रारअर्ज दिला.

बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनीही अडीच कोटी रुपयांच्या अपहाराबाबत तक्रार केली आहे. बॅंकेचे माजी अध्यक्ष, संचालक, अधिकारी व कर्जदारांनी कट रचून, संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करून अडीच कोटींचा अपहार केला. ठेवीदार, सभासदांची फसवणूक केली. प्रशासकांच्या आदेशान्वये चौकशी अधिकारी ऍड. डी. व्ही. चंगेडे यांनी चौकशी करून 29 जूनला प्रशासकांना अहवाल दिला. त्याद्वारेही हा अपहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याने, गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केली आहे.

याबाबत प्रशासक मिश्रा अथवा प्राधिकृत चौघांपैकी कोणीही कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद द्यावी, असे पत्रात पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT