Confusion about scholarship exams due to corona disease
Confusion about scholarship exams due to corona disease 
अहमदनगर

कोरोनाचा शिष्यवृत्ती परीक्षेत आडवा पाय

दौलत झावरे

नगर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळांतील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आहे. त्यात आता शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, असा प्रश्‍न विद्यार्थी-पालकांना पडला आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्चप्राथमिक (पाचवी) व पूर्वमाध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांनी कोरोना काळातच करून घेतली. जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षकांनी शिष्यवृत्तीबाबत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे. निकालाचा टक्का वाढविण्यासाठी शिक्षण विभागासह शिक्षकांचे प्रयत्न सुरू असून, कोरोनातही अनेक शिक्षकांनी गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले. 

दर वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होत होती. मात्र, यंदा कोरोनामुळे यात खंड पडला. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहेत. मात्र, अद्याप परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नाही. ही प्रक्रिया आगामी आठवड्यात केली जाण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज सादर झालेले नसल्याने, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे यंदा ही परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, असा प्रश्‍न पालकांपुढे उभा राहिला आहे. प्रशासनाने अद्याप तरी त्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पालकांच्या संभ्रमात भर पडली आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह ही परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी घेण्याबाबतचे नियोजन करून प्रात्यक्षिक घेणे गरजेचे आहे. या दोन्ही प्रक्रियांचे धडे विद्यार्थ्यांना दिल्यास परीक्षा निर्विघ्न पार पडून प्रशासनाची धावपळ टळेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिष्यवृत्ती सराव प्रश्‍नसंच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेचा सराव चांगल्या प्रकारे होऊ शकतो. 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. आगामी परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करताना शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांबाबत मार्गदर्शन करावे. शासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात येतील. 
- गुलाब सय्यद, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT