Nagar mahapalika 
अहिल्यानगर

महारपौर निवडणूक ः शिवसेना उमेदवाराला दगा-फटाक्याची भीती

अमित आवारी

नगर ः महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेत सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

काँग्रेसचे मात्र कोणीही उपस्थित नव्हते. शिवाय, काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यासाठी महापौर व उपमहापौरपदाचे प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज नेण्यात आले. त्यामुळे शेंडगे या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत की नगरमधील नवीन विकास आघाडीच्या, याबाबत महापालिकेत चर्चा रंगली होती.

नगर महापालिकेतील महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, तर उपमहापौरपद खुले आहे. महापालिकेत आज दुपारी शिवसेनेच्या शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले आदी उपस्थित होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शिवसेनेचा एक गट राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर, तर दुसरा गट अलिप्तपणे दुसऱ्या बाजूला बसल्याचे चित्र होते.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शहरात घडलेल्या दोन घटनांमुळे आमदार संग्राम जगताप व शिवसेनेचे नेते यांच्यात वितुष्ट निर्माण झाले होते. मनातील त्या जखमा अजून भरलेल्या नसल्याचे, शिवसेनेचा मोठा गट व राष्ट्रवादीचे नेते यांच्या वर्तणुकीवरून दिसत होते. त्यातच काँग्रेसच्या शीला चव्हाण यांच्यासाठी महापौर व उपमहापौरपदासाठीचे अर्ज नेल्याने महाविकास आघाडीचे गणित अजून तरी नगर शहरात जुळले नसल्याचे चित्र आहे.

उपमहापौरपदाचा उमेदवार गुलदस्तात

उपमहापौरपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या (मंगळवारी) उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल होईल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठीचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याची चर्चा महापालिकेत होती. उपमहापौरपदासाठी गणेश भोसले व विनित पाऊलबुधे यांची नावे चर्चेत आहेत. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या शीला चव्हाण यांनी आज उमेदवारी अर्ज नेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी काम करीत आहे. नगरमध्ये ही आघाडी होऊ नये, यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने ही महाविकास आघाडी झाली आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी यांचे मनोमिलन झाले आहे.

- भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख

रविवारी झालेल्या चर्चेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. शहरात विकासासाठी काम होईल. महाविकास आघाडी म्हणून हा अर्ज भरला गेला आहे.

- आमदार संग्राम जगताप

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज नेण्यात आला आहे. आज (मंगळवारी) तो दाखल करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

- दीप चव्हाण, काँग्रेस नेते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT