Contaminated water supply to Ahmednagar 
अहिल्यानगर

नगरकरांना मैला, रक्तमिश्रित पाणी पुरवठा, नगरसेवकानेच उघडकीस आणला प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नगर : महापालिकेच्या जलवाहिनीतून मैला, रक्‍तमिश्रीत, तसेच प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे असणाऱ्या पाण्याचा शहरातील 50 हजार कुटुंबांना पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसेवक गणेश भोसले यांनी आज शहरातील दोन ठिकाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. गळतीच्या ठिकाणी हे दूषित पाणी वाहिनीत जात असल्याचे समोर आले. 

महापालिकेच्या 900 एमएम सिमेंट पाइपलाइनद्वारे 1972पासून शहरातील सारसनगर, भोसले आखाडा, रेल्वेस्टेशन रस्ता, आगरकर मळा, कायनेटीक चौक, दौंड रस्ता, माणिकनगर, माळीवाडा, टिळक रस्ता परिसरातील 50 हजार कुटुंबांना वसंत टेकडी येथून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या 20 दिवसांपासून या पाईपद्वारे खाटीक गल्लीतील लालपाणी, मैलमिश्रीत गटारीचे पाणी व प्राण्यांचे अवयव सीएसआरडी कॉलेज जवळील लिकेजमधून येत आहे.

महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कुठलीही उपाययोजना व लिकेज दुरुस्तीचा प्रयत्नही केला नाही. मागील चार दिवसांपूर्वी आमच्या भागाला पाणीपुरवठा न करण्याच्या सूचना वॉलमनला दिल्यानंतर महापालिकेने लिकेज दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 

या ठिकाणी महापालिकेचा पुन्हा एकदा अजब कारभार डोळ्यासमोर आला. 900 एमएम पिण्याच्या पाईपलाईनवरुन ड्रेनेजची पाईपलाईन 

टाकण्याला सुरवात झाली. संपूर्ण भारतात असे काम कुठेही झाले नाही, परंतु नगरमध्ये ते होत आहे. ही ड्रेनेजची पाईपलाईन दुसऱ्या बाजूने शिफ्ट करण्याच्या सूचना दिल्या आहे. अन्यथा आंदोलन करीन, असा इशारा गणेश भोसले यांनी दिला आहे. 

नागरिकांच्या जीवाशी खेळ 
या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार उद्‌भवत आहेत. महापालिका ही नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. पाणीपुरवठा विभाग हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. परंतु पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते हे फक्त आयुक्त, महापौर व ठेकेदारांपुरतेच काम करत असतात.अशा अधिकाऱ्यांमुळे महापालिकेची बदनामी होत असते. त्यांची अधिकारी म्हणून नव्हे तर क्‍लर्क म्हणून नेमणूक करावी, असे आरोप नगरसेवक गणेश भोसले यांनी केले. 

अधिकाऱ्यांना पाजणार मैलामिश्रीत पाणी 
नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी आयुक्त शंकर गोरे यांना सारसनगर भागात होणाऱ्या मैलमिश्रीत पाण्याबाबतचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मैलमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मैलमिश्रीत पाण्याचा प्रश्न येत्या दोन दिवसांत मार्गी न लागल्यास महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांना मैलमिश्रित पाणी पाजले जाईल, असा इशारा प्रकाश भागानगरे यांनी महापालिका आयुक्‍तांना दिला आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्तीसाठी खोदाई केली होती. त्यात जलवाहिनी फुटल्याने गळती लागली होती. आता ते काम पूर्ववत केले आहे.

रोहिदास सातपुते, पाणीपुरवठा विभागप्रमुख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT