Primary Teachers' Bank general meeting sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळानंतर गुरुजींमध्ये समन्वय

प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत कायम ठेव कपातीवरून विरोधकांनी गदारोळ केला.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत कायम ठेव कपातीवरून विरोधकांनी गदारोळ केला. सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यासही ते आडकाठी करीत होते. दुपारच्या सत्रातही तेच धोरण होते. मात्र, सर्व मंडळांच्या नेत्यांची समन्वय समिती नेमण्याचे ठरले. समितीच्या अहवालानंतर दोन महिन्यांनी पुन्हा सभेला सामोरे जाण्याचा सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतला.

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (रविवारी) झाली. कायम ठेवीचा विषय स्थगीत ठेवून उर्वरित सर्व विषय मंजूर झाले. बँकेचे अध्यक्ष डॉ. संदीप मोटे यांनी विरोधकांच्या आक्रमक मुद्यांना संयतपणे उत्तरे दिली. याही वर्षी सभा न गुंडाळता सत्ताधाऱ्यांनी सायंकाळी साडेपाचपर्यंत चालवली.

सभेपुढे एकूण १६ विषय मांडण्यात आले होते. त्यात विकास मंडळाकडे सभासदांच्या कायम ठेवीतून २० हजार रुपये वर्ग करण्याचा विषय वादग्रस्त ठरला. विरोधकांनी त्याला कडाडून विरोध केला. सत्ताधाऱ्यांनीही टीकेऐवजी उपाय सूचवण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांनी ठेवीचा विषय रद्द करण्यासाठी धोशा लावला.

गुरुकुलचे डॉ. संजय कळमकर, गुरुमाऊलीचे (रोहकले गट) प्रवीण ठुबे, संजय धामणे, राजेंद्र शिंदे, नवनाथ आडसूळ आदींनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला. सकाळच्या सत्रात बँकेची सभा सुरू झाली. मात्र, सुरवातीपासूनच विरोधकांनी ठेवीचा मुद्दा टार्गेट केला गेला. त्यांच्या गटातील काही सभासदांनी निषेध फलक झळकावले. सभासदांना भूमिका मांडू द्या, असे अध्यक्ष डॉ. मोटे सांगत होते. आम्ही सभा गुंडाळणार नाही, फक्त संसदीय भाषा वापरा, असे आवाहनही त्यांना वारंवार करावे लागले.

समन्वय समिती निर्णय घेणार

संजय कळमकर (अध्यक्ष), दत्ता पाटील कुलट, राजेंद्र ठोकळ, संजय धामणे, प्रवीण ठुबे, आबा लोंढे, बाळासाहेब कदम, दिनेश खोसे या नेत्यांची समन्वयक समिती नेमली आहे. दोन महिन्यांत ही समिती सर्वांना विश्वासात घेऊन विकास मंडळाच्या जागेबाबत काय निर्णय घ्यायचे हे ठरविल.

दोन महिन्यांनी त्यावर विशेष सभा घेऊन निर्णय घेतला जाईल. यापूर्वीही विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची तयारी होती. परंतु कोणी पुढे येत नव्हते. आता सभेनिमित्त समन्वय समिती गठीत झाल्याचा आनंद आहे, असे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.

गुरुजींच्या चारचाकी, ट्रॅफिक जॅम

बँकेचे जिल्ह्यात अकरा हजारांवर गुरुजी सभासद आहेत. सभेसाठी सुमारे तीन हजार शिक्षकांनी हजेरी लावली. सर्वच गुरुजी अलीशान चारचाकी वाहनांतून आले होते. परिणामी कल्याण रस्त्यावर तसेच सभेच्या ठिकाणी सर्वत्र गुरुजींचीच वाहने दिसत होती. काहींनी रस्त्यावरच अस्ताव्यस्त पार्किंग केल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.

कळमकरांच्या कानपिचक्या

दुपारच्या सत्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तांबे यांनी माफी मागितली पाहिजे, असा अट्टहास होता. धामणे यांनी साहेबराव अनाप यांच्या हातातील माईक हिसकावत माफीचा मुद्दा काढला. त्यावरून गोंधळ झाला. तांबे काहीही वावगे बोलले नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते.

माफीशिवाय सभा चालवायची नाही, यावर विरोधक ठाम होते. त्यावरून गोंधळ आणखीच वाढला. त्यावेळी कळमकर यांनी समन्वयकाची भूमिका घेतली. गुरुजींची वास्तू झाली पाहिजे. परंतु सत्ताधाऱ्यांनी ठेवीबाबत प्रबोधन करायला हवे होते. आपल्यावर झालेल्या टीकेलाही त्यांनी कानपिचक्या देत उत्तरे दिली.

बापू बोलले, विरोधकांना झोंबले

गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी संजय कळमकर, संजय धामणे यांच्या आरोपांचे खंडण केले. सभेला कोणतेही बाउन्सर आणले नाही. उलट विरोधकांनीच तसा प्रयोग केल्याचा बाउन्सर मारला. ठेवीचा विषय मान्य नसेल, तर सर्व नेत्यांनी समन्वय समिती नेमावी. त्यातून मार्ग काढता येईल. हे पटवून देत असताना विरोधी गटातून घोषणाबाजी झाली.

धामणे यांना शांततेचे आवाहन करताना आपणही सत्तेत होता, चर्चेसाठी सहकार्य करा. त्यावेळी तांबेंना भावकीतील शिक्षकाने बोलण्यास अटकाव केला. त्यावर ते म्हणाले की, आपली भाऊबंदकी तिकडे गावाकडे ठेवू. इथे बँकेबाबत चर्चा करू. हे बोलणेही विरोधकांना चांगलेच झोंबले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT