Corona-affected villages also began to appear 
अहिल्यानगर

सावधान! वाड्या-वस्त्याही व्हायला लागल्या कोरोनाबाधित

दत्ता इंगळे

नगर तालुका ः नगर तालुक्‍यात कोरोना पुन्हा डोकेवर काढू लागला आहे. डामडौलात लग्नकार्य, विविध सार्वजनिक सोहळे, कार्यक्रमांना गर्दी वाढू लागल्याने गेल्या आठवडाभरात तालुक्‍यातील मोठ्या गावांसह आगदी वाड्यावस्त्यांवर ही कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. 

नगर तालुक्‍यातील बहुतेक गावे शहराच्या निकट असल्याने प्रत्येक घरामागे एकतरी व्यक्ती नित्याने शहरात आहे. त्यात कामगार, दूध, भाजी विक्रेते, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा समावेश आहे. तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने काही गावांतील आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला.

ग्रामस्थच मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स बाबत उदासीन असल्याने तालुका प्रशासन चिंतेत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मागील पाच दिवसांत नगर तालुका प्रशासन व पोलिस विभागाने सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरीही ग्रामस्थांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याचेच चित्र आहे. 
 

कोरोना अजून गेलेला नाही. मास्कच आपले प्राण वाचवू शकतो. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. गरज असल्यासच घराबाहेर पडा. नियमांचे पालन करावे. वृद्धांनी अधिक काळजी घ्यावी. 
-डॉ. ज्योती मांडगे-गाडे 
तालुका आरोग्याधिकारी 

तालुक्‍यात दंडात्मक कारवाई करूनही अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. मास्क, सॅनेटायझर व सोशल डिस्टन्स हाच सध्या आपला जीवनरक्षक आहे. विविध कामानिमित्त शहरात जाणाऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन करावे. नगर तालुक्‍यातील कोरोना मीटर थांबवण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. 
-उमेश पाटील 
तहसीलदार, नगर तालुका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Victim Father Statement: “माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत येऊ नका” नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी राजकीय नेत्यांना फटकारलं

Shrirampur Crime: प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या मुलाकडून वडिलांचा खून; श्रीरामपुरात धक्कादायक घटना, घरगुती कलहाचा थरारक शेवट!

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

Education Success Story: शेतमजूर कुटुंबातील मयुरी लावंडची झेप; बारावीत ८६% गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

Delhi Judge Endlife : बाबा, मी आता जगू शकत नाही... ३० वर्षीय न्यायाधीशाने गळफास घेऊन संपवले जीवन, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT