Corona disease spread in Mahashivaratri program
Corona disease spread in Mahashivaratri program 
अहमदनगर

महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात मिळाला कोरोनाचा प्रसाद, गावालाच आला वेढा

वसंत सानप

जामखेड : महाशिवरात्रीला गावच्या कार्यक्रमात नागरिक एकत्र गोळा झाले. त्यातून कोणीतरी बाधित झाले. त्याने सगळ्या गावाला वानवळा दिला. कोरोना चाचणी केली असता गावातील सव्वाशेजण कोरोना बाधित झाले. आणखी कितीजण सापडतील याचा अंदाज प्रशासनाला ही येईना. तालुक्यातील दिघोळ या गावात ही कोरोना स्टोरी घडली. मांजरा नदी तिरावरील आणि जिल्हा हद्दीवरील दिघोळ हे  सधन गाव आहे. मात्र, गेल्या आठड्यापासून येथील स्वास्थ्य हरपले आहे.

सव्वाशेजणांना बाधा

गेली आठवडाभरापासून दिघोळकर कोरोनाच्या संसर्गाने त्रस्थ आहेत. येथे गेल्या आठ दिवसात तब्बल 120 कोरनाबाधित रुग्ण आढळल्याची नोंद तालुका आरोग्य विभागाकडे आहे. अन्यत्र उपचार घेणारे वेगळेच.

 जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्पामध्ये  क्वारंटाईन असलेल्या पैकी काहींची सुटका सोमवार( ता.23) पासून व्हायला लागली असली तरी दररोज कोरोना संर्गाने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.

दरम्यान दिघोळ लॉकडाऊन करण्यात आले आहे. गावातून बाहेर येण्यास व बाहेरून गावात जाण्यास नागरिकांना "मज्जाव" करण्यात आला आहे. तलाटी सचिन खेत्रे,ग्रामसेवक अभिजित लहूळ,पोलिस पाटील गीते व सरपंच गीते गावात तळ ठोकून आहेत.

हायवेवरचं गाव

पैठण-पंढरपूर पालखी मार्गावरील तालुक्यातील दिघोळ  हे रहदारीच्या रस्त्यावर असलेले गाव कोरोना संसर्ग वाढल्याने हैराण झाले आहे. दररोज रुग्णांचा आकडा वाढतो आहे. त्यामुळे प्रशासनासह ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

काय झालं... कसं झाल...
येथील काही ग्रामस्थ पुणे व नंतर खर्डा येथे  विवाहाच्या निमित्ताने गेले होते आणि तेथूनच त्यांना कोरोनाची बाधा झाली.गावात महाशिवरात्रीला कार्यक्रम होता.  लोक एकत्र आले आणि तेथेच कोरोनाचा फैलाव पसरला.  निम्म्या गावाच्या तपासण्या झाल्या असून तब्बल 120  कोरनाबाधित नागरिक आढळले आहेत. 
दरम्यान गावातील पाच लोकांचे निधन झाले. यापैकी एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होता असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तर अन्य व्यक्ती इतर आजारांमुळे मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.

दिघोळमधील परिस्थिती रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर उपायोजना सुरू आहे. नागरिकांना कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी पी. पी. कोकणे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी दिघोळला भेट दिली.

रोहित पवारांची भेट

आमदार रोहित पवार हे देखील सोमवार( ता. 23) रोजी दिघोळला गेले होते. त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. ग्रामसेवक अभिजित लहूळ, तलाठी सचिन खेत्रे, सरपंच नानासाहेब गीते, उपसरपंच बळीराम तागड, सदस्य पवनकुमार डावखर, पोलीस पाटील राजेंद्र गीते व अन्य ग्रामस्थांशी संवाद साधला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT