Corona free Karjat, Parner Pune, Mumbaikars again virus 
अहिल्यानगर

कोरोनामुक्त कर्जत, पारनेर झाले पुणे, मुंबईकरांमुळे पुन्हा बाधित

सकाळ वृत्तसेवा

नगर ः अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. संगमनेर येथील ५२ वर्षीय रुग्णाने कोरोनावर मात केली.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्याने ते घरी परतले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २२० झाली आहे. हा आकडा मोठा आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेची माहिती आहे. एकीकडे ही स्थिती असताना पुन्हा पुणे आणि मुंबईकरांमुळे बाधित होण्याचा सिलसिला सुरूच आहे.

जिल्ह्याच्या आज तीन रूग्ण वाढले. त्यात कर्जत तालुका, पारनेर आणि संगमनेर तालुक्याचा समावेश आहे.

पुण्याहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे अहवातून समोर आले आहे. कांदिवली (मुंबई) येथून प्रवास करून पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आलेल्या 68 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित निघाला.

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील 34 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडली. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.

जिल्हयातील अॅक्टिव केसेस ३८ आहेत. एकूण रुग्णसंख्या २६९ झाली आहे. एकूण स्त्राव तपासणी ३५९१ झाले आहेत. मागील महिन्यापासून दररोज कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. परगावहून येणाऱ्यांमुळे ही बाधा होत असल्याचे समोर आलेले असतानाही प्रशासनाकडून म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT