Corona infection in three patients at Sangamner 
अहिल्यानगर

संगमनेरात टोमॅटो व्यापाऱ्यासह तीनजणांना कोरोना, जोर्वे, घुलेवाडीत शिरकाव

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या संगमनेर शहरातील नायकवाडपुरासह तालुक्यातील जोर्वे व घुलेवाडी येथील दोन असे तीन रुग्ण आढळून आल्याने तालुक्य़ात पुन्हा खळबळ उडाली आहे.

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर संगमनेरातील कोरोना मीटर पुन्हा सक्रिय झाले अाहे. आज प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार 45 वयाच्या पुढील तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

या पूर्वी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या शहरातील नायकवाडपुरा भागातील एका 59 वर्षीय व्यक्तीला तसेच घुलेवाडी येथील 48 वर्षीय व जोर्वे येथील 45 वर्ष वयाच्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

त्यांच्यावर सध्या घुलेवाडीच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. जोर्वे येथे प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला अाहे. ही व्यक्ती टोमॅटो व्यापारी असल्याची चर्चा आहे. जोर्वे व घुलेवाडीच्या बाधीतांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमुळे संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 87 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: अजिंक्य रहाणेच्या मेहनतीवर सहकाऱ्यांनी फिरवले पाणी; लखनौला दिली पुनरागमनाची संधी, कोलकातात मोठा ड्रामा

Deglur NCP leadership change: देगलूर राष्ट्रवादीत खांदेपालट; शिवाजीराव कनकंटे तालुकाध्यक्ष, मंगल आलुरकर व नारायण पाटील यांना जिल्हा उपाध्यक्षपदाची बढती

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

SCROLL FOR NEXT