नीलेश लंके यांना कोरोना केसरी किताब
नीलेश लंके यांना कोरोना केसरी किताब ई सकाळ
अहमदनगर

लंके कोरोना केसरी! हिंद केसरींनी दिली चांदीची गदा नि एक लाख

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) ः राज्यात अन् देशातही कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. या महामारीत अनेकांचे जीव जात आहेत. अशा भयानक कोरोना साथीच्या आजारातही स्वतःच्या जीवावर उदार होत आमदार नीलेश लंके फाईट करीत आहेत. त्यांनी भाळवणी येथे एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर उभारून तेथे ते रात्रं-दिवस सेवा देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव सुरोली (कराड) येथील हिंद केसरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. लंके यांना हिंद केसरी संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा, एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र देऊन कोरोना केसरी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. (Corona Kesari Award to MLA Nilesh Lanke)

कोरोनाच्या अतिशय कठीण प्रसंगात जनतेला आधार देण्यासाठी व कोरोना रूग्णांची सेवा करण्यासाठी भाळवणी येथे कोविड सेंटर उभे केले आहे. त्यांच्या या कामाची राज्यात चर्चा आहे. त्यांचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी त्यांच्या कामाची वाहवा केली आहे.

आमदार लंके यांना कोरोना त्यांच्या कामाबद्दल कोरोना केसरी किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. लंके यांचा अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व एक लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये लंके यांचा सामाजिक काम अतुलनीय आहे. लंके यांनी एकाच वेळी लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकाची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली आहे. त्यांची ही लोकसेवा निश्चितच इतरांच्या दृष्टीने प्रेणादायी आहे.

राज्यातील एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे जनता आदराने पाहत आहे. लंके हे स्वतः मैदानात उतरून आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी कोरोनाशी दोन हात करीत आहेत. या पुरस्कार प्रदान करताना नवनाथ पाटील (भाऊ), सुरोलीचे सरपंच दत्तात्रय वेताळ, समाजसेवक निसार मुल्ला, पैलवान सोनू मदने आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात कोरोना रूग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे आदर्श काम आहे. त्यांचे काम राज्याला दिशादर्शक आहे. त्यांनी कोरोना बरोबरची कुस्ती चीतपट करण्याचे काम केले आहे. म्हणून सुरोली येथील हिंदकेसरी फाउंडेशनच्या वतीने त्यांना कोरोना केसरी हा किताब देण्यात आला.(Corona Kesari Award to MLA Nilesh Lanke)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT