Corona to Mumbai patient again in Parner 
अहिल्यानगर

पारनेरमागे जावयाची बला... आईला कोरोना झाला नि लेक सासुरवाडीला पळाला

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेरकरांच्या मागे लागलेले जावयाचे शुक्‍लकाष्ठ काही संपता संपत नाही. मुंबईतून येथे येणाऱ्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यात पुन्हा एकदा भाळवणी येथील जावयाने प्रशासनाची आणि गावकऱ्यांची डोकेदुखी वाढविली आहे.

अधिक माहिती अशी : भाळवणी येथील जावई असलेल्या पवई (मुंबई) येथील कुटुंबातील एका महिलेला कोरोनाच्या संशयावरून काल (सोमवारी) रात्री तेथील प्रशासनाने ताब्यात घेतले. त्यामुळे संंबंधित कुटुंब घाबरले. अशा कठीण काळात सासुरवाडीच आपला आधार बनू शकते असे त्या जावयाला वाटले. संबंधित कुटुंबाने मागचा-पुढचा विचार न करता, प्रवासासाठीची परवानगी न घेता रातोरात मोटारीने (एमएच 46 एडब्लू 1690) थेट भाळवणी गाठले.

गावकऱ्यांच्या ही बाब ध्यानात आली नाही. मात्र, मुंबई प्रशासन त्यांच्या मागावर होते. त्यांनी ही घटना नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ पारनेरच्या तहसीलदारांना कळविले. तातडीने पारनेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व तहसीलदारांनी भाळवणी येथे जाऊन या कुटुंबाला ताब्यात घेतले. 

जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. तहसीलदारांच्या आदेशानुसार या पूर्ण कुटुंबाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात वाहनचालकासह चारजणांचा समावेश आहे. या कुटुंबातील चार लहान मुले, दोन मुलींनी हा प्रवास केला. ज्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. ती संबंधित जावयाची आई आहे.  

दरम्यान, टाकळी ढोकेश्‍वर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सात संशयितांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. त्यांपैकी सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, एक अहवाल येणे बाकी आहे. तसेच, मांडवे येथील व्यक्तीचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे टाकळीकरांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT