ONCE AGAIN CORONA PATIENT 
अहिल्यानगर

सावधान... नगर शहरात पुन्हा घुसला कोरोना...सुभेदार गल्लीतील महिलेला लागण

सकाळ वृत्तसेवा

नगर - नगर शहर कोरोनामुक्त झालेले असताना पुन्हा त्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे नगरकरांची काळजी वाढली आहे. नगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे.  जिल्ह्यात आता संगमनेर तालुक्याती धांदरफळ येथे कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत.

या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

नगर शहरात गेल्या काही दिवसंपासून एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा शहरातील सुभेदार गल्ली भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तात्काळ या भागात प्रतिबंधक उपाययोजना करणे सुरू केले आहे. यापूर्वी नगरमध्ये मुकुंदनगर भागात कोरोनाचे रूग्ण आढळले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: अमृतकुंडातील शिवलिंग 'नव्याने प्रकट' नाही, त्र्यंबकेश्वर देवस्थानने केला खुलासा

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: सायन पनवेल महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा

Sangli DCC Bank Recruitment : 444 लिपिक पदांच्या भरतीचा वाद चिघळला! राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात सांगली जिल्हा बँक न्यायालयात, 'सर्किट बेंच'च्या भूमिकेकडे लक्ष

Crime: विवस्त्र अवस्थेत ब्युटी पार्लरमध्ये घुसण्याचा प्रयत्न, महिलेसोबत धक्कादायक कृत्य; बदलापूरमधील घटना

SCROLL FOR NEXT