Karnataka Politics Live : सतीश जारकीहोळी यांच्या घरावर ईडीची छापेमारी
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बुधवारी सकाळी अचानक छापे टाकले. आबकारी विभागातील कथित गैरव्यवहार, बार परवाना अनियमितता आणि मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.