corona 1283 
अहिल्यानगर

येथे सलग दुसऱ्या दिवशी सापडला कोरोना रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा

नगर : सलग महिनाभर एकही रुग्ण नगर शहरात सापडला नाही. त्यामुळे शहर कोरोनामुक्त झाले असे समजून सगळेजण बाहेर पडू लागले होते. काल सुभेदार गल्लीतील एक महिला सापडल्यानंतर आत सारसनगरमधील एक व्यक्ती सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

शहरातील सुभेदार गल्लीतील वृध्द महिला सापडल्यानंतर प्रशासनाकडून हा परिसर सील करण्यात आलेला असून तेथील त्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासण्या सुरु करण्यात आलेल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोच सारसनगर येथील एका 53 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 56 झाला आहे. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्ण राहत असलेल्या परिसराला निर्जंतुक करण्यात येत आहे. तसेच ही व्यक्ती आणखी कोणा-कोणाच्या संपर्कात आली होती. याची माहिती घेऊन त्या व्यक्तींना आणून त्यांची तपासणीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात कोरोना बाधीत आढळून आल्यामुळे शहरात घबराट निर्माण झालेली आहे. 

कोरोना संदर्भातची आकडेवारी 
बाधित : 56 
उपचारार्थी : 12 
कोरोनामुक्त : 40 
कोरोनामुळे मृत्यू : 04

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT