Corona positive for 36 prisoners in Shrigonda 
अहिल्यानगर

कोरोना लागला कैद्यांच्या मागे, श्रीगोंद्यात ३६जणांना बाधा

संजय आ. काटे

श्रीगोंदे : नगर जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. तो आता बंदिवानांच्याही मागे लागला आहे. कोठडीतील कैदी कसे काय बाधित होतात, हाही प्रश्न सर्वसामान्यांसह प्रशासनालाही सतावत आहे. जिल्ह्यात यापूर्वी संगमनेर, कोपरगाव, राहुरी, कर्जतमधील कैदी बाधित झालेले आहेत. हे लोण आता श्रीगोंद्यातही आले आहे.

श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील कारागृहात असलेल्या 55पैकी 36 कैदी कोरोनाबाधित निघाल्याने खळबळ उडाली आहे. यात अनेक कैदी गंभीर गुन्ह्यांतील असून, त्यांना आता नगरला हलविण्यात आले आहे. त्यांच्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले.

आज सकाळी चार कैद्यांना त्रास जाणवत असल्याने त्यांची कोरोना तपासणी झाली. त्यात ते पॉझिटिव्ह आल्याने अन्य कैद्यांची तातडीने तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. दुपारपर्यंत चाचणी सुरू होती. 55 कैद्यांची तपासणी केल्यावर त्यांतील 36 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. 

जे कैदी कोरोनाबाधित आले, त्यांमध्ये खून, दरोडे, बलात्कार, असे आरोप असलेले आरोपी असल्याने यंत्रणा सावध झाली आहे. या कैद्यांना नगरच्या कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT