Corona report of a person in Shirasgaon in Nevasa taluka is positive 
अहिल्यानगर

नेवासेच्या ग्रामीण भागातही कोरोनाचचा शिरकाव; शिरसगावचा एकजण पॉझिटिव्ह

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : नेवासे, सोनई, शनीशिंगणापूरनंतर आता कोरोनाने जायकवाडी फुगवटा भागात शिरकाव केला. तालुक्यातील शिरसगाव येथे ५१ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.
घाशात दुखायला लागल्याने या व्यक्तीला सलाबतपूर (ता. नेवासे) येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने ही व्यक्तीला नेवासे फाटा येथील विलगिकरण कक्षात सोमवारी (ता. १३) २९ वर्षीय मुलांसह दाखल झाली. दोन दिवसांपूर्वीच या व्यक्तीचा स्राव नमुने पुणे येथे पाठवण्यात आले होते.

त्यात ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने सलाबतपुर येथे जाऊन या व्यक्तीवर उपचार करणारे डॉक्टरांसह त्या व्यक्तीच्या मुलाला विलगिकरणा कक्षात दाखल करून त्यांचे तातडीने घशातील स्राव नमुने तापासणीसाठी पाठवले. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची चौकशी केली असता ती व्यक्ती कोणाच्याच संपर्कात न आल्याचे सांगत असल्याने तालुका प्रशासनाची डोकेदुखी झाली आहे.

दरम्यान या व्यक्तीच्या मुली संगमनेर येथे दिलेल्या आहेत. ही व्यक्ती त्यांच्याकडे किंवा त्या यांच्याकडे आल्या असतील असा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे. 
तहसीलदार रुपेश सुराणा म्हणाले, सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्याबरोबर विलगिकरणा त असलेल्यला त्याचा मुलगा व त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांचे स्राव नमुने घेतले असून त्यांना विलगिकरण कशात दाखल केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

Gemini AI Saree Trend Alert: जेमिनी नॅनो बनाना AI साडीचा ट्रेंड फॉलो करताना व्हा अलर्ट, व्हिडिओ शेअर करत महिलेने समोर आणला धक्कादायक प्रकार

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

ब्रेक अप के बाद! हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवीन अभिनेत्री; Jasmin Walia सह नातं संपलं? Mahieka Sharma ची आयुष्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT