

Pat Cummins - Ishan Kishan
Sakal
Ishan Kishan Likely to Captain SRH: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण यादरम्यानच सनरायझर्स हैदराबादबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व इशान किशन (Ishan Kishan) करण्याची शक्यता आहे.
खरंतर आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात सनरायझर्स हैदराबादचे (Sunrisers Hyderabad) नेतृत्व पॅट कमिन्सने (Pat Cummins) केले होते. त्याच्या नेतृत्वात २०२४ मध्ये या संघाने अंतिम सामन्यापर्यंतही धडक मारली होती.