Corona vaccination stalled for five days in Rahuri 
अहिल्यानगर

राहुरीत पाच दिवसांपासून कोरोना लसीकरण ठप्प, डोसचा तुटवडा

विलास कुलकर्णी

राहुरी : तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. ज्येष्ठ नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत; परंतु लस शिल्लक नसल्याने मागील पाच दिवसांपासून लसीकरण ठप्प आहे. 

लस घेण्यासाठी बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिक आढेवेढे घेतात. लसीकरणानंतर होणाऱ्या त्रासाच्या गैरसमजातून त्यांची मानसिक तयारी नसते. मात्र, त्यांच्या मनातील भीती कमी करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी हेलपाटे मारण्यास सुरवात केली.

राहुरी तालुक्‍यातील तीन ग्रामीण रुग्णालये व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण सुरू होते. पाच दिवसांपासून तेथे लस उपलब्ध होत नसल्याने, तसेच जिल्हा रुग्णालयातून लस मिळत नसल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. 
 

वांबोरी, ताहाराबाद ग्रामीण रुग्णालयांतील लस संपली आहे. पाच दिवसांपासून लाभार्थी हेलपाटे घालत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लस मागितली आहे. 
- डॉ. श्रीकांत पाठक, वैद्यकीय अधीक्षक, राहुरी ग्रामीण रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT