Corona vaccination test successful in Ahmednagar
Corona vaccination test successful in Ahmednagar 
अहमदनगर

कोरोना लसीकरणाची चाचणी नगरमध्ये यशस्वी

अमित आवारी

नगर : जिल्हा आरोग्य प्रशासनाने आज कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम (ड्रायरन) घेतली. महापालिकेत झालेल्या ड्रायरनची पाहणी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त डॉ. राजेंद्र भोसले यांनी, तर ग्रामीण भागातील वाळकी येथील ड्रायरनची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केली.

आजची ड्रायरन चाचणी यशस्वी झाली. आता लवकरच कोरोना लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्ह्यातील तीन ठिकाणी आज लसीकरणाची सरावफेरी अर्थात ड्रायरन झाली. त्यात सुरवातीच्या टप्प्यात लस कशी देणार, याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महापालिकेच्या तोफखाना येथील नागरी आरोग्य केंद्रात पाहणी केली.

वाळकी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी पाहणी केली. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने लसीकरणाची सरावफेरी यशस्वीरित्या पूर्ण केली. लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. 

तोफखाना नागरी आरोग्य केंद्रात महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. नलिनी थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका गोरे, डॉ. सुजीत सैंदाणे, मंगला माटे, प्रतिमा राऊत, पूनम सूर्यवंशी, निर्मला गायकवाड आदींनी संयोजन केले. 

वाळकी ग्रामीण आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले. डॉ. अनिल ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यात डॉ. नंदा वाघ, डॉ. मनीष बडे, डॉ. सुवर्णा कांबळे, डॉ. व्ही. पी. शेजाळ, डॉ. रुपाली काळे, शेख नसरीन यांनी सूचनांचे पालन करीत हा ड्रायरन पार पडला. 

असे होणार लसीकरण 
आरोग्य केंद्रात आल्यानंतर नागरिकांची ओळखपत्र पाहणी, त्यांच्या शरीराचे तापमान व ऑक्‍सिजन तपासणी करण्यात येईल. नंतर त्यांना प्रतीक्षा कक्षात बसविले जाईल. तेथून त्यांना लसीकरणाच्या कक्षात नेले जाईल. तेथे कोविन ऍपवर त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा झाल्यानंतर लसीकरण होईल. लसीकरणानंतर किमान अर्धा तास विश्रांती कक्षात थांबवले जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT