Corona virus 842 patients in Ahmednagar district 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोना व्हायरस सुसाट; जिल्ह्यात बाधितांची हजारीकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा फैलाव वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. शुक्रवारी आणखी 48 जण कोरोनाबाधित आढळल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्ह्यात रुग्णसंख्या 842वर पोचली आहे. 
जिल्हा रुग्णालयातून आज दुपारी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार, नगरमध्ये सहा, भिंगार सात, पारनेर दोन आणि संगमनेर, शेवगाव, राहाता येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळला. नगरमधील पद्मानगर येथील तीन, टीव्ही सेंटर, फकीरवाडा, पाइपलाइन रस्ता येथील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यांत समावेश आहे. भिंगारमधील गवळीवाडा येथे तर तब्बल सात रुग्ण आढळून आले. याशिवाय संगमनेर तालुक्‍यात संगमनेर खुर्द येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. पारनेर तालुक्‍यातील पारनेर शहर व भाळवणी येथे प्रत्येकी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. निंबेनांदूर (शेवगाव), पाथरे (राहाता) येथेही प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळला. 
सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये आणखी 30 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यांत जिल्हा रुग्णालयातील अहवालांत 15 जण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. यात नगरमधील तीन, भिंगार दोन, संगमनेर सात आणि अकोले, श्रीरामपूर व नगर तालुक्‍यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय खासगी प्रयोगशाळेत 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नगरमधील आठ, राहाता चार, नगर तालुका दोन आणि संगमनेर येथील एकाचा समावेश आहे. नगरमधील पद्मानगर, गवळीवाडा व सुडके मळ्यातील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. 
संगमनेर तालुक्‍यात कनोली येथे चार, ढोलेवाडी येथे तीन रुग्ण आढळून आले. देवठाण (अकोले) येथे एक रुग्ण आढळला. श्रीरामपूर व नगरजवळील के. के. रेंज येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. भिंगार येथे दोन रुग्णांना बाधा झाली. याशिवाय खासगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार नगर शहरातील माळीवाडा, माणिकनगर, नंदनवननगर (सावेडी), भिडे चौक (सावेडी), बिशप लॉईड कॉलनी, तोफखाना, बागरोजा हडको, भिस्तबाग रस्ता, सावेडी येथे प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आढळला. नगर शहराजवळच्या ग्रामीण भागात वाघ मळा, वडगाव गुप्ता, विळद घाट येथेही प्रत्येकी एकाला कोरोनाची बाधा झाली. कोल्हार (राहाता) येथे चार आणि संगमनेरलाही एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. 

आणखी 35 जणांना डिस्चार्ज 
जिल्ह्यातील आणखी 35 जणांनी कोरोनावर मात मिळवली. त्यांत नगर 13, संगमनेर 13, कोपरगाव तीन, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या तब्बल 529वर पोचली आहे. 

कोरोना मीटर 
7612 व्यक्तींची तपासणी 
842 पॉझिटिव्ह 
6336 निगेटिव्ह 
612 निरीक्षणाखाली 
1167 होम क्वारंटाईन 
430 अहवाल येणे बाकी 
529 रुग्णांना डिस्चार्ज 
20 जणांचा मृत्यू 

संगमनेरमध्ये द्विशतक 
संगमनेर तालुक्‍यात कोरोनाबाधितांच्या संख्येने द्विशतक गाठले आहे. ही संख्या आजअखेर 206वर पोचली. त्यामुळे संगमनेरकर पुरते हादरले आहेत. शिवाय, या तालुक्‍यात कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT