"Corona's condition is serious in this district! 
अहिल्यानगर

कोरोनाने दाबले नगरचे नाक...आणखी पाचजण पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यासह शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. नगर शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या माळीवाड्याला कोरोनाने घेरले आहे. तेथील रूग्णामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भागात लोकसंख्येची घनता खूप आहे. त्यामुळे प्रादूर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. माळीवाडा शहराचे नाक समजला जातो. कोरोनाने नेमके नाकच दाबले आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी पाच जणांची भर पडली. त्यात राहाता तीन, नगर शहर, कोपरगाव प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 212 वर पोचला आहे. दरम्यान, आणखी 12 जणांना बूथ हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 121 झाली आहे. 

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार निघोज निमगाव (राहाता) येथील 50 वर्षांची महिला व प्रवरा नगर (राहाता) येथील 34 वर्षांची महिला व अकरा वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय नगर शहरातील पंचपीर चावडी येथील 48 वर्षांची व्यक्ती, धोत्रे (कोपरगाव) येथील 14 वर्षांच्या मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे. 

जिल्ह्यातील बारा व्यक्तींनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यात नगर शहरातील पाच, संगमनेर दोन, राशीन (कर्जत) दोन, नेवासे, राहाता व अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. उर्वरित 29 अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 212 झाली. त्यात महापालिका क्षेत्र 47, नगर जिल्हा 108, अन्य राज्य दोन, अन्य देश आठ, इतर जिल्ह्यातील 47 जणांचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT