Corona's entry into Parner's court, too, sealed the premises 
अहिल्यानगर

पारनेरच्या न्यायालयातही कोरोनाची एन्ट्री, परिसर केला सील

मार्तंड बुचुडे

पारनेर  ः तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. आज (ता. 24 ) तालुक्यातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आज कोरोनाने थेट पारनेरच्या न्यायालयातही शिरकाव केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा परीसर 14 दिवसांसाठी सील करण्यात आला आहे.

तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या शंभऱ झाली आहे. आज न्यायालयीन कर्मचा-याचा खाजगी लॅबचा अहवाल पॉझटिव्ह आल्याने कोरोनाने पारनेर न्यायालयातही प्रवेश केला आहे. त्यामुळे न्यायालय व परीसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. न्यायालयाचा सुमारे शंभर मीटर परीसर सील करण्यात आला आहे.

तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत शंभर रूग्णांची नोंद झाली आहे. त्या पैकी 57 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर सध्या 43 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने पाच रूग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

तालुक्यात सुमारे 60 हजाराहून अधिक मुंबई व पुण्यास नोकरीनिमित्ताने असलेला वर्ग गावी आपल्या कुटुंबासह आला आहे.

सुरूवातीच्या काळात बाहेर गावाहून आलेल्या या लोकांमुळे तालुक्यात कोरोनास सुरूवात झाली होती. मात्र अता स्थानिकांना वेगवेगळ्या कारणांनी विशेषताः संपर्कातून कोरोनाची लागण होऊ लागली आहे.

तालुक्यातील कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे अता कोरोना रूग्णांवर एकाच ठिकाणी उपचार होत आहेत.
गेली दोन दिवसात सुपे आद्योगिक वसाहतीमध्येही दोन कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सुपे औद्योगीक वसाहतीमध्येही अता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

तालुक्यात अनेक कामगार तसेच नोकर वर्ग तालुक्याच्या बाहेरून तर काही नोकरवर्ग थेट जिल्ह्याच्या बाहेरून तालुक्यात दररोज येत आहे. आता या कर्माचा-यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती निर्माण झाली आहे.

नगरमुळे बाधा

भाळवणी येथे कोरोनाची मागील आठवड्यात झालेली लागण ही नगरहून जा - ये करणा-या कर्मचा-यामुळेच झाली होती. अाता या नोकरवर्गास तालुक्यात राहाण्याचे बंधऩ घालावे किंवा त्यांना कामावर येऊच नये असा आदेश प्रशासनाने काढणे गरजेचे आहे. तशी मागणीही अता जनतेतून होत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; २८ वर्षांचा भारताचा दुष्काळ संपवला...

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT