Corona's financial loss to gym professionals
Corona's financial loss to gym professionals 
अहमदनगर

जीमचालकांचा जीव आला मेटाकुटीला, ट्रेनरही पैशाअभावी कुपोषित

सुनील गर्जे

नेवासे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेल्थ क्‍लब व "जिम' गेल्या सात महिन्यांपासून बंद आहेत. अनेक "जिम'चालकांनी बॅंकांचे कर्ज काढून हा व्यवसाय उभारला. मात्र, आता कर्जाच्या ओझ्याखाली ते दबले आहेत.

दुसरीकडे येथील प्रशिक्षकांवरही (फिटनेस ट्रेनर) बेरोजगारीची वेळ आली आहे. सरकारने अन्य व्यवसायांप्रमाणे काही नियम-अटी घालून "जिम' सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

नागरिकांना व्यायाम व तंदुरुस्तीचे वेड लावून आरोग्यविषयक जागृती निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी दैन्यावस्था झाली आहे. नेवासे शहरासह तालुक्‍यात गेल्या आठ-दहा वर्षांत तरुणांमध्ये पिळदार शरीरयष्टीची क्रेझ वाढली. त्यातून त्यांना नियमित व्यायामाची सवय लागली. त्यातूनच नेवासे शहर, कुकाण्यासह तालुक्‍याच्या ग्रामीण भागात जागोजागी "जिम', हेल्थ क्‍लब उभे राहिले. त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक संबंधितांनी केली. 
"जिम' उभारण्यासाठी 10 ते 75 लाख रुपयांपर्यंत काहींनी गुंतवणूक केली आहे. त्यासाठी काहींनी आपली मालमत्ता विकली, काहींनी बॅंकांकडून कर्ज घेतले. मोक्‍याची जागाही भाडेतत्त्वावर घेतल्या. "जिम' उभारल्यावर तेथे येणाऱ्या सभासदांना शिकविण्यासाठी प्रशिक्षकांची गरज निर्माण झाली. त्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती चांगल्या पगारावर नेमले. साधारणपणे एक "जिम'व्यावसायिक महिन्याकाठी 40 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत होती. 

तालुक्‍यात जवळपास 15-20 "जिम' व हेल्थ क्‍लब आहेत. मात्र, कोरोनामुळे सरकारने त्यावर बंदी घातली. मागील सात महिन्यांपेक्षा अधिक काळापासून त्या बंदच आहेत. "जिम'मालकांवरील बॅंकेचे कर्ज व त्यावरील व्याज वाढत आहे. जागांचे भाडे थकले. वीजबिल, पाणीपट्टी थकली. अनेक प्रशिक्षक, कामगार बेरोजगार झाले. 

प्रोटिनयुक्त आहार पडून 
ग्रामीण भागात अनेक तरुणांनी शरीरसौष्ठवासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या (सप्लिमेंट्‌स) विक्रीकरिता लाखो रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केले. मात्र, "जिम' बंद असल्याने दुकानातील माल तसाच पडून आहे. परिणामी, हे व्यावसायिकही आर्थिक अडचणीत आले आहेत. 


ग्रामीण भागात लाखोंचे कर्ज काढून "जिम' व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनामुळे सात महिन्यांपासून "जिम' बंद असल्याने कर्जाचे ओझे वाढत आहे. सरकारने "जिम', "हेल्थ क्‍लब' सुरू करण्यास परवानगी द्यावी. 
- तुषार कल्हापुरे, संचालक, तुषार फिटनेस वर्ल्ड, कुकाणे 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT