Raman Gangakhedkar
Raman Gangakhedkar  
अहमदनगर

भारतात पुन्हा कोविडची लाट अशक्य : डॉ. गंगाखेडकर

सतीश वैजापूरकर

शिर्डी : चीनमध्ये सध्या सुरू असलेली कोविडची लाट ते कशा पध्दतीने आटोक्यात आणतात हे पहावे लागेल. मोठी लोकसंख्या असल्याने या लाटेतून बदललेला नवा कोविड विषाणू येऊ शकतो. अर्थात तो कसा असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. तथापि एका अमेरिकन कंपनीचे पॅक्सलोव्हीड व नीरमाट्रेलव्हीर हे औषध कोविड बाधेची लक्षणे दिसताच पाच दिवसाच्या आंत घेतले तर रूग्णालयात भरती व्हावे लागत नाही, हे सिध्द झालेय. पुढील तीन-चार महिन्यांत या औषधाचे भारतात उत्पादन सुरू होईल, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

कोविड प्रकोपात देशपातळीवर महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर हे अंबेजोगाई येथील स्वामी रामानंदतीर्थ शासकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी. एड्सबाबत त्यांनी केलेले संशोधन व राबविलेल्या मोहिमांबद्दल त्यांना दोन वर्षांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याबद्दल अंबोजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीतील सहका-यांनी येथे एकत्र येऊन त्यांचा सत्कार केला. त्यांचे येथील वर्गमित्र डॉ. एम. वाय. देशमुख तसेच डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. पी. जी. गुंजाळ, डॉ. प्रकाश कांकरीया, डॉ. अमर देशमुख, डॉ. सई बोरावके देशमुख व उद्योजक किशोर बोरावके यावेळी उपस्थित होते.

अंबेजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात 1975 सालची पहिली तुकडी. डॉ. रमण गंगाखेडकर हे आमचे वर्गमित्र, दहावीची परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. एक बुध्दिमान विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. कोविड प्रकोपात आणि त्यापूर्वी एड्सचा फैलाव होऊ लागला. त्यावेळी देशातील जनमानसाला शास्त्रशुध्द पध्दतीने धीर देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या सत्कारासाठी राज्यभरातील त्यांचे वर्गमित्र काल शिर्डीत एकत्र जमले.

- डॉ. एम. वाय. देशमुख, जनरल सर्जन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT