crime news esakal
अहिल्यानगर

Crime News : चोरलेले साडेचार तोळे दागिने मोलकरणीने दिले परत; कारण...

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी : घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातील साडेचार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले मात्र पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच काही तासातच या महिलेने चोरून नेलेले सोने परत आणून दिले.

लंका संतोष शिरसाठ असे या मोलकरणीचे नाव आहे. शिरसाठ ही तालुक्यातील हनुमान टाकळी येथील सेवानिवृत्त महिला अधिकारी सुभद्रा नवनाथ बर्डे यांच्या घरी कामाला होती. बर्डे यांनी त्यांचे वापरातील सोन्याचे दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे दागिने घराच्या कपाटात ठेवले होते.

हे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर बर्डे यांनी शिरसाठ हिच्याकडे विचारपूस केली असता तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर बर्डे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी शिरसाठ हिला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच तिने चोरी केल्याची कबुली देत जमिनीत पुरून ठेवलेले दागिने काढून दिले.

या कारवाईत पोलिस नाईक अनिल बडे,अमोल कर्डीले,एकनाथ बुधवंत,राजेंद्र बडे,मनिषा धाने,मनिषा वारे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT