Srirampur  sakal
अहिल्यानगर

Srirampur : आईला शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेऊन दगडाने केली निर्घृण हत्या ; दोन आरोपी अटक

ग्रामीण पोलीसानी काही तासात केले आरोपींला गजा आड

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर :पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुणवंतराव देशमुख परिसर कवडीपूरमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर मृतकाचे नाव अजय शालीकराव येवले वय ४० वर्ष रा. ओम नगर असे आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस आणि वसंतनगर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व अवघ्या काही तासातच यातील आरोपी गजानन काळे आणि शेख समीर शेख सलीम दोन्ही राहणार श्रीरामपूर यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतक अजय येवले याने आरोपी गजानन च्या आईला शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून बुधवारी रात्री १ ते १;३० वाजताच्या सुमारास दगडाने मारून अजय येवले याची हत्या केली.

हत्याकरून दोन्ही आरोपी फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी गोपनीय माहितीवरून दोघांना पुसद बसस्थानाकातून अटक करण्यात यश आले. सदरची कारवाई वसंत नगरचे पोलीस निरीक्षक नाचनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक चव्हाण, मुन्ना आडे, कुणाल मुंडोकार, संजय पवार, सतीश शिंदे, चालक अनंता तारमेकवाड यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT