police esakal
अहिल्यानगर

Crime: गुन्ह्यातील संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; मृत्यूस पोलिस जबाबदार मुलाचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

परळी वैजनाथ: शहरातील एका चोरीच्या प्रकरणात मंगळवारी (ता.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास जरीन खान व समीर खान या बाप-लेकाला शहर पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती.

रात्री दहाच्या सुमारास जरीन खान याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूस पोलिस जबाबदार असल्याचा आरोप मुलगा समीर खान याने केला. रात्री मोठा जमाव ठाण्यासमोर जमला होता. पोलिस प्रशासनातील अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत.

शहरात सहा जूनला चार लाख ९० हजार रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. याच प्रकरणात संशयित म्हणून जरीन खान (वय ४८) व समीर खान (वय २६, दोघे रा. बरकतनगर, परळी) यांना शहर पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली.

पोलिस कोठडीत जरीन खान यांचा रात्री मृत्यू झाला. पोलिसांनी जरीन खान यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वडिलांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप समीर खानने केल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काल मध्यरात्री पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव एकवटला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी दाखल होत स्थिती नियंत्रणात आणली. जरीन खान यांचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झालेला नाही तर त्याला फिट्स येत होत्या, त्यातून ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

अभिनय क्षेत्रातून अचानक गायब झालेले गिरीश परदेशी आता काय करतात? १० वर्षांनंतर सांगितलं खरं कारण

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 75,000 पार, Suzlon फोकसमध्ये; पाहा महत्त्वाचे अपडेट्स

Nanded: दीड महिन्यापासून भाऊ कोमात, उपचारसाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; लेक पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Chandrapur: घरात गांजाचा साठा; चंद्रपुरात तरुण अटकेत; मातंग मोहल्ल्यात पोलिसांचा छापा; १ किलो गांजा जप्त

SCROLL FOR NEXT