Murderer
Murderer  Sakal
अहमदनगर

चोरट्यांच्या मारहाणीत युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

सोनई : चांदे (ता. नेवासे) येथील लोहारवाडी रस्त्यावर असलेल्या कर्डिले वस्तीवर दोन चोरट्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात बावीस वर्षीय युवक ठार झाला, तसेच दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. एक) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज (बुधवारी) गावात ‘बंद’ पाळला.याबाबत समजलेली माहिती अशी ः मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता दोन चोरटे कर्डिले वस्तीवर आले. आवाज झाल्याने घराबाहेर झोपलेल्या नर्मदा कर्डिले यांनी ‘कोण आहे’ म्हणून हटकले असता, चोरट्यांनी त्यांचा गळा दाबला.

यावेळी घरातून बाहेर आलेल्या अर्चना व बापू कर्डिले यांना चाकूचा धाक दाखवत दागिने हिसकावून घेतले. ही झटापट सुरू असताना मदतीसाठी आलेल्या गंगाधर नामदेव कर्डिले व त्यांचा मुलगा ओमकार याने एका चोरट्यास पकडून ठेवले.दुसऱ्या चोरट्याने साथीदार पकडला गेल्याचे पाहिले आणि पुन्हा मागे पळत येत कर्डिले पिता-पुत्रांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ओमकार (वय २२) याचा मृत्यू झाला, तर गंगाधर व बापू कर्डिले गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती समजताच मध्यरात्री एक वाजता सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल व पथकाने घटनास्थळी भेट दिली. आज दुपारी तीन वाजता ओमकारवर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह मराठा महासंघाचे संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत निषेध केला. नवनाथ कर्डिले यांच्या फिर्यादीवरून, रेकॉर्डवरील आरोपीच्या छायाचित्रातून ओळख पटल्याने बाबाखान शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव, ता. नेवासे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले आहे.

भेट शेवटची ठरली

मृत्युमुखी पडलेला ओमकार चेन्नई येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सुटी असल्याने तो आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्याची ही भेट शेवटची ठरल्याने, वडील गंगाधर, आई वृषाली, बहीण सई व आजीस अश्रू अनावर झाले.

पोलिस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट

आज सकाळी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक अजित पाटील यांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांसह घटनास्थळाला भेट दिली, तसेच पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

SCROLL FOR NEXT