amc 3 
अहिल्यानगर

दलित वस्तीलाच विकास निधी मिळेना

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक दलितांची संख्या असताना, या प्रभागालाच गेल्या दोन वर्षांत दलितवस्ती सुधार योजनेतील निधी मिळाला नसल्याचा आरोप उपमहापौर मालन ढोणे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना आज निवेदन दिले. तसेच गेल्या दोन वर्षांत नागरी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून सुचविलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. 

निवेदनात ढोणे यांनी म्हटले आहे, की महापालिकेला 2018-19मध्ये 5 कोटी 90 लाख, तर 2019-20 मध्ये अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मार्गदर्शक तत्त्वानुसार या निधीतून दलित वस्तीत विकासकामे होणे आवश्‍यक होते. महापालिकेच्या 17 पैकी 9 प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. पैकी प्रभाग 9 मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून, सर्वाधिक अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिक या प्रभागात आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असतानाही 2018-19 व 2019-20 या वर्षात प्राप्त झालेल्या निधीतून एकही विकासकाम झालेले नाही. 

अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभागात 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी प्राधान्याने विकासकामे करण्याबाबत परिपत्रकात म्हटले आहे. असे असताना प्रभाग क्रमांक 9मध्ये या परिपत्रकाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास येते. राखीव प्रभागाच्या नावाखाली दलितवस्ती नसलेल्या ठिकाणी ही कामे प्रस्तावित आहेत. विकासकामे प्रस्तावित करताना कामांची निवड व निश्‍चिती करणारा सर्वसाधारण सभेचा ठराव आवश्‍यक आहे. तसा ठराव न करता, महापौर, तसेच महापालिकेने सुचविलेल्या कामांच्या पत्रानुसार कार्यवाही केली जाते. सरकारी योजना व महत्त्वाकांक्षी धोरणे दलित समाजापासून दूर राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गेल्या दोन वर्षांत नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत प्राप्त शासकीय निधीमधून सुचविलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT