bhingar nala in ahmednagar 
अहिल्यानगर

भिंगार नाल्यात बंगले 

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरात प्रवेश करताच अजस्र भिंगार नाला अशक्‍त होतो. नाल्याच्या गाळपेरीत भिंतींचे बांध घालत नागरिकांचे उंचच उंच "महाल' उभे राहिलेले दिसतात. या "महालां'च्या काळ्या अतिक्रमणांना महापालिका अधिकाऱ्यांकडून बांधकामाचे परवाने देण्यात आलेले आहेत. गाळपेर महसूल प्रशासनाची असूनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. 

नगर तालुक्‍यातील कापूरवाडी शिवारातील डोंगरापासून भिंगार नाला उगम पावतो. हा नाला भिंगार शहरातून सोलापूर रस्ता ओलांडून नगर शहरात प्रवेश करतो. रस्त्याच्या पलीकडे भिंगार हद्दीत मोठा असलेला हा नाला नगर शहरात येताच छोटा होतो. त्याचे खळाळत धावणारे पाणी नगरमध्ये येताच गपगुमान, संथ गतीने, अंग चोरत वाहू लागते. जागोजागी मातीचे ढीग नाल्याच्या पात्रात टाकून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. गाळपेरीत बांधकामे करण्यात आलेली आहेत. या बांधकामांत पुराचे पाणी येऊ नये, यासाठी नाल्याच्या पात्रात उंच भिंती घालण्यात आल्या आहेत. मात्र भिंगार परिसरात जोरदार पाऊस झाल्यास या नाल्याला पूर येतो. पुराचे पाणी भिंतींना न जुमानता आजूबाजूच्या घरांमध्ये शिरते. तीन वर्षांपूर्वी भिंगार नाल्याचे पाणी सारसनगर भागातील रहिवाशांना आपली दहशत दाखवून गेले. पूनममोतीनगर, सारसनगर, मार्केट यार्ड, कानडे मळा, कोंबडीवाला मळा, जुन्या व्हिडिओकॉन कंपनीचा परिसर आदी ठिकाणी भिंगार नाल्याच्या पात्रात व गाळपेरीत अतिक्रमणे झालेली आहेत. 

हेही वाचा : नगर जिल्ह्यातील या औद्योगिक वसाहतीत पाण्याची निर्जळी

नगर-सोलापूर रस्त्यावर भिंगार हद्दीत नाल्याचे असलेले अजस्र स्वरूप पूल ओलांडून नगर शहराच्या हद्दीत येताच, नाल्याचे स्वरूप लहान होते. या नाल्यात मातीचा भराव टाकून तो अरुंद करण्यात आला आहे. महापालिकेकडून जुजबी नालेसफाईही करण्यात येते. पूरनियंत्रण रेषेतच महावितरणचे वीजखांब उभे करण्यात आले आहेत. 

अवश्य वाचा : जिल्हा परिषदेत परस्पर भरती...तीन जणांना नोटिसा

कोंबडीवाला मळा परिसरातील पूल पावसाने वाहून गेला आहे. या पुलाजवळ शहरातील मैलामिश्रित सांडपाणी महापालिकेने, कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यात सोडले आहे. त्यामुळे या नाल्यात प्रदूषण झाले आहे. पुलाजवळ प्रदूषित पाण्यामुळे फेस येत आहे. महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. 

पूनममोतीनगरमध्ये भिंगार नाल्याच्या गाळपेरीत अतिक्रमणे करून मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींवर महापालिका अधिकाऱ्यांकडून विशेष मेहेरबानी झाली असल्याची चर्चा शहरात आहे. 

सारसनगर पूल : सारसनगर पुलाच्या एका बाजूला मातीचे उंच भराव, तर दुसऱ्या बाजूला भिंती घालण्यात आल्या आहेत. भराव व भिंतींचा आधार घेत गाळपेरीत अतिक्रमण करण्यात आले आहे. मोठ्या काही व्यावसायिकांनी गाळपेरीत प्लॉट तयार करून ते महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून मंजूर करवून घेत, सर्वसामान्य लोकांना त्यांची विक्री करून त्यातून मोठी माया कमावली. 

ढोर वस्ती भागात गाळपेरीत भराव घालून नाल्याचे पात्र लहान केले आहे. या भागात गाळपेरीमध्ये गोडाऊन तयार करण्यात आली आहेत. काही इमारतींची बांधकामेही गाळपेरीत उभी आहेत. सारसनगरकडील भागात नाल्याच्या पात्रालगत घरे बांधण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

IPL 2026 Auction: मुंबई, महाराष्ट्र अन् विदर्भाचे खेळाडूही मालामाल; राज्यातील 'या' १० खेळाडूंवर लागली बोली

CNG and PNG Rate: मोठी बातमी! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार; पण किती रुपयांनी? जाणून घ्या...

Prithviraj Chavan refuses to apologize Video : ‘’माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी का माफी मागू?’’ ; ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत वादग्रस्त विधानावर पृथ्वीराज चव्हाण ठाम!

SCROLL FOR NEXT