zp ahmednagar
zp ahmednagar 
अहमदनगर

येथे नांदतो अंधार...

दौलत झावरे

नगर : जिल्हा परिषदेने चार मजली अद्ययावत इमारत उभारली. मात्र, वीज खंडित झाल्यास अनेक विभागांत अंधार पसरतो. दैनंदिन कामात अडथळे येतात. अभ्यागतांना वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत थांबावे लागते. जिल्हा परिषदेचे कामच ठप्प होत असल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे. 

जिल्हा परिषदेने अद्ययावत चार मजली इमारतीत सर्वच विभाग स्थलांतरित केले आहेत. काही विभागांत इन्व्हर्टरची सोय असली, तरी ती अधिकारी- पदाधिकाऱ्यांच्याच दालनांपुरती मर्यादित आहे. कर्मचाऱ्यांना विजेची वाट पाहत बसावे लागते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वच यंत्रणा बंद पडते. जिल्हा परिषदेत जनित्राची सुविधा असली, तरी सभागृहात कार्यक्रम असेल तरच ते सुरू केले जाते. इतर वेळी वीज खंडित झाल्यास ते बंदच असते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. 


जिल्हा परिषदेकडून डिझेलची बचत करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे, वीज खंडित झाल्यानंतर अंधार पसरतो. त्याचा मनस्ताप अभ्यागतांना सहन करावा लागतो. जिल्हा परिषद सदस्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यक्रम, सभा असल्यास जनित्र सुरू केले जाते. एरवी मात्र त्याचा वापर केला जात नाही. 
- वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी अमोल कीर्तीकरांच्या प्रचार रॅलीमध्ये? राजकारण तापण्याची शक्यता

Mahanand Dairy : महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा; पाच वर्षांचा करार अन्...

Who is Sanjiv Goenka: केएल राहुलला झापणारे, धोनीला कर्णधारपदावरून हटवणारे; कोण आहेत संजीव गोयंका?

Diljit Dosanjh: रॅपर नसीबनं केलं ट्रोल, दिलजीत दोसांझनं मोजक्या शब्दात उत्तर देऊन केली बोलती बंद, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : आम्ही सत्तेत आलो तर मुस्लिमांचे आरक्षण काढून घेऊ- अमित शहा

SCROLL FOR NEXT